
प्रतीनिधी : मागील आर्थिक वर्षात संघाचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर रु.२/- दरफरक अदा करणेचे ठरवलेले होते. या दरफरकाची रक्कम दोन टप्प्यांमध्ये अदा करणेत येत आहे:
पहिला टप्पाः ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रति लिटर रु.१/- प्रमाणे एकूण रक्कम रु. ६ कोटी ४३ लाख इतकी रकम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. याचा लाभ ८५५ दूध संस्थांना व त्यामार्फत हजारो शेतकऱ्यांना मिळाला.
दुसरा टप्पाः मार्च २०२५ मधील दूध बीलांमध्ये उर्वरित रु.१/- प्रति लिटर रक्कम जमा करण्यात आली असून, रक्कम रु. ६ कोटी ४३ लाख ४६ हजार इतकी रक्कम थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. याचा लाभ ८५६ दूध संस्थांना व त्यामार्फत हजारो शेतकऱ्यांना मिळाला.
संघाचे चेअरमन अॅड. स्वप्नील ढमढेरे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, “दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. संघाच्या माध्यमातून केवळ नफा नव्हे, तर शेतकऱ्यांचा विकास आणि त्यांचे सक्षमीकरण हे आमचे ध्येय आहे.”
भविष्यातील विशेष योजनाः
दूध संकलनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
शितसाखळी (Cold Chain) अधिक मजबूत करणे.
पशुखाद्य व खते यामध्ये शेतकऱ्यांना सबसिडीची सुविधा वाढविणे.
‘ गुणवत्तेवर भर देऊन ‘कात्रज ब्रेड’ अधिक बळकट करणे.
नविन दुग्धजन्य उत्पादने व आयुर्वेदिक दूध उत्पादने बाजारात आणणे.
महिला व युवा शेतकऱ्यांना प्रशिक्षण व स्वयंरोजगाराची संधी देणे.
कात्रज दूध संघ केवळ एक संस्था नसून, ग्रामीण भागातील हजारो शेतकऱ्यांचे स्वप्न आणि आधार आहे भविष्यातही संघ अधिक व्यापक पातळीवर काम करुन संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श संस्था म्हणून नावारुपाला येईल असा विश्वास अॅड. स्वप्नील ढमढेरे यांनी व्यक्त केला.

















