
माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोषअण्णा लोंढे यांचा पराभव करीत ठरले
प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा निकाल शु्क्रवारी लागला.भाजपाने पुन्हा बहूमताने सत्ता मिळवली.मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोसरीच्या प्रभाग सात अ मधील उमेदवार विराज लांडे यांचा विजय या निकालात लक्षवेधी ठरला.त्याला चार मुख्य कारणे आहेत.एक,तर ते त्यांच्या प्रभागात राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक निवडून आले.दुसरे मोठे महत्वाचे कारण म्हणजे लांडे घराण्याचा महापालिका निवडणुकीतील राजकीय वारसा त्यांनी टिकवलाच नाही,तर तो पुढे चालवलाही. तिसरे मोठे कारण म्हणजे स्थानिक आमदार भाजपचे महेश लांडगे असतानाही त्यांनी तेथे बाजी मारली.पहिल्यांदा निवडणूक लढवून त्यांनी माजी स्थायी समिती सभापती तथा अध्यक्ष संतोषअण्णा लोंढे यांना पराजित केले हे सर्वात मोठे कारण म्हणावे लागेल.कारण त्यातून ते जायंट किलर ठरले.
vo2
विराज लांडे निवडून आलेला प्रभाग भोसरी विधानसभा मतदारसंघात येतो.तेथे भाजपाने बाजी मारली.बहूमताने सत्ता मिळविण्यात सिंहाचा वाटा या मतदारसंघातील प्रभागांनी तथा नगरसेवकांनी उचलला.त्याला प्रभाग सातही अपवाद राहिला नाही.तेथेही त्यांचे तीन नगरसेवक निवडून आले.पण,शत प्रतिशत भाजपा तेथे विराज लांडे यांच्यामुळे झाली नाही.या मतदारसंघात त्यांच्या तीन माजी स्थायी समिती सभापती तथा अध्यक्षांना पराभवाचे तोंड पहावे लागले.त्यातील एक संतोषअण्णा लोंढे यांना विराज लांडे यांनी पराभवाची धूळ चारली.त्यांनी २,६४३ मतांनी लोंढेंचा पराभव केला.त्यांनी १२,७०८ मते खेचली.तर, लोंढेंना ती १०,०६५ पडली.जनतेने निवडणूक हातात घेतली होती असे सांगत त्यांना बदल हवा होता,अशी प्रतिक्रिया त्यांनी आपला आवाज ला दविराज यांचे वडिल विश्वनाथ लांडे हे २०१२ मध्ये नगरसेवक होते.त्याअगोदर त्यांचे चुलते व भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे,त्यांच्या पत्नी मोहिनी लांडे हे नगरसेवक होते.मोहिनी लांडे व विलास लांडे यांनी महापौरपदही भुषविले.विराज यांचे आजोबा विठोबा लांडे,हे नगरपालिका असताना नगरसेवक होते.तर,गतवेळी २०१७ ला त्यांचे चुलत बंधू तथा विलास लांडे यांचे पूत्र विक्रांत हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.तर,यावेळी विराज विजयी झाले.त्यातून लांडे कुटुंबाची विजयाची पताका पुढे फडकत राहिली.
गेल्या वेळचे भाजपचे दोन माजी स्थायी समिती सभापती सात शेजारच्या प्रभाग आठमध्ये पराभूत झाले.त्यातील सीमा सावळे या अनुभवी व ज्येष्ठ नगरसेविकेचा पराभव धक्कादायक आहे.तो करणारे भाजपचे डॉ.सुहास कांबळे हे,ही विराज लांडगे यांच्यासारखेच जायंट किलर ठरले.सावळे या भाजपतर्फे गेल्यावेळी निवडून येऊन स्थायी च्या सभापती झाल्या होत्या.या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.तर, डॉ.कांबळे हे ही काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये आले अन थेट नगरसेवक झाले.तर,दुसरे स्थायीचे माजी सभापती विलास मडिगेरी यांना राष्ट्रवादीचे तुषार सहाणे यांनी पराभूत केले. गेल्यावेळी २०१७ ला ते शिवसेनेचे उमेदवार होते.तेव्हा राष्ट्रवादीचे विक्रांत लांडे यांनी त्यांचा पराभव केला होता.ते नुकतेच सावळे यांच्याबरोबर राष्ट्रवादीत आले आहे
















