
भोसरी दि (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड शहरात विखुरलेल्या समस्त सिरवी समाजाच्या सुख-दुःखामध्ये सदैव साथ देणाऱ्या अजित गव्हाणे यांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा आहे असे सिरवी समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले. या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करतानाच सिरवी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही अजित गव्हाणे यांनी दिली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नेहरूनगर येथे माजी विरोधी पक्ष नेते राहुल भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज (दि.10) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सिरवी समाजाच्या वतीने महाविकास आघाडी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी माजी महापौर हनुमंत भोसले, विरोधी पक्ष नेते राहुल भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर, सिरवी समाजाचे अध्यक्ष वाघाराम केशवजी चौधरी, उपाध्यक्ष बाबुलाव पन्नाजी चौधरी, सचिव गणेशराम लाधाजी चौधरी, रमेश रामजी चौधरी, युवा सचिव मोहनलाल धोघारामजी चौधरी, महिलाध्यक्ष संतोष भेराराम चौधरी आदी उपस्थित होते



















