
दि.२२/०९/२०२५ रोजी भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांनी जीएसटीमधील नविन सुधारणांची घोषणा केलेली आहे. लोकांच्या जीवनमानाचा खर्च कमी करणे आणि आर्थिक उलाढालींना चालना देण्याच्या उद्देशाने ही एक ऐतिहासिक सुधारणा असल्याचे म्हटले आहे. जीएसटी दरातील सुधारणांमुळे ग्राहकांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला.
दुग्धजन्य पदार्थांमध्ये पनीर, आईस्क्रीम, बटर व तुप इत्यादींचे दर कमी झालेले असून त्याचे जुने व नविन दर खालीलप्रमाणेः
अ.न.
तपशील
जुने दर
नवीन दर
१.
पनीर १ किलो
रु.४३०/-
रु.४१०/-
२.
गाई तुप १००० मिली रु.७००/- रु.६६०/-
म्हैस तुप ५०० मिली रु.३८०/- रु.३६०/-
मँगो, चॉकलेट, बटरस्कॉच आईस्कीम १००० मिली रु.१८५/- रु.१७३/-
वॅनिला, स्ट्रॉबेरी, पिस्ता आईस्क्रीम १००० मिली. रु.१८०/- रु.१६०/-
बटर ५०० ग्रॅम रु.२९५/- रु.२८०/-
पुणेकर ग्राहकांनी जीएसटी दरातील बदलामुळे जास्तीत जास्त दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संघाचे चेअरमन अॅड. स्वप्नील ढमढेरे साो. यांनी केले.


















