
भोसरी – विधानसभा निवडणूकी वेळी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ओळखपत्राची गरज भासते. अशा वेळी नागरिकांची धावपळ होऊ नये, यासाठी राष्ट्रीय कर्तव्यांप्रती जागरूक राहून भोसरीतील ॲड. बाळासाहेब थोपटे यांनी लिव्ह अँड लायसन्स (भाडेकरार) सुविधा नागरिकांसाठी मोफत उपलब्ध केली आहे.
सदर सुविधेचा नागरिकांना 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत लाभ घेता येईल. केवळ शासकीय शुल्क नागरिकांना भरायचे आहे. अधिक माहितीकरिता व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आळंदी रोड भोसरी येथील कर्यालयाशी नागरिकांनी संपर्क साधावा. अशी माहिती एडवोकेट बाळासाहेब थोपटे यांनी दिली आहे


















