
प्रतिनिधी : सध्या बाजारात दूध खरेदी दर व पशुखाद्याचे दरामध्ये वाढ झालेली असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो हमीभाव मिळावा या हेतुने तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साो. यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन वारंवार दूध खरेदी दरामध्ये वाढ करणेस सांगितल्याने व सणासुदीचे दिवस असल्याने पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दि.०१/०९/२०२५ रोजी पासून गाय दूधाचे (३.५ फॅट व ८.५ एसएनएफ साठी) खरेदी दरात प्रति लिटर रु. १ वाढ करणेचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
दि. ०१/०९/२०२५ पासून गाय दूधाचा (३.५ फॅट व ८.५ एसएनएफ साठी) खरेदी दर प्रति लिटर रु.३५/- वरकड खर्चासह संस्थांसाठी रु. ३५.८० राहिल. दि.०१/०८/२०२५ रोजी रु.१/-. दि.२७/०८/२०२५ रोजी रु.१/- व दि.०१/०९/२०२५ रोजी रु.०१/- ने अशी एकूण महिन्या भरात रु. ३/- ने दूध दरात बाढ केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
तरी जिल्ह्यातील दूध उत्पादक व सर्व दूध संस्थांनी संघास स्वच्छ, ताज्या व भेसळ विरहित उच्चतम गुणप्रतीच्या दूधाचा जास्तीत-जास्त पुरवठा करावा असे आवाहन संघाचे चेअरमन अॅड. श्री. स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे यांनी केले.

















