
पुणे : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे वतीने पुणे कॅम्प कमांड हॉस्पिटल येथे मिलिटरी मुनिटचे मागणीनुसार आज दि. ३/१०/२०२५ रोजी अदययावत कात्रजच्या दुध व दुग्धजन्य पदार्थाच्या पार्लरचे मेजर जनरल बी नंबीआर (एव्हीएसएम एसएम व्हीएसएम) यांचे शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी ब्रिगेडियर संगीता खन्ना, ब्रिगेडियर एस एन कुलकर्णी, ब्रिगेडियर अमीथा एम पीटर्स, कर्नल ईश्वर दास, कर्नल कुलीन, बौरपत्नी श्रीमती. वैशालीताई पवार, संपाचे अधयक्ष मा. अॅड स्वप्निल ढमढेरे साो.. उपाध्यक्ष मा. श्री. मारुती जगताप साते., मा.श्री. गोपाळ म्हस्के साो., मा.श्री. विष्णु हिंगे सारे., मा.श्री.बाळासाो नेवाळे सारे., मा.श्री.बाळासाहेब खिलारी साो., मा.सी. केशरताई पवार साहे., मा.श्री. भगवानराव पासलकर साो., मा.श्री.दिलीप थोपटे सारे., मा.श्री. राहल दिवेकर साो., मा श्री. अरुण चांभारे साो., मा.श्री. भाऊ देवाडे साो., मा.श्री. कालिदास गोपालघरे साो., मा.सौ. लताताई गोपाळे सारे., मा.श्री. निखिल तांबे सतो., मा.श्री. चंद्रकांत भिंगारे साो., व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोज लिमये सारे., तसेच संपाचे अधिकारी व कर्मचारी वृंद उपरथित होते.
मेजर जनरल बी नंबीआर (एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम) म्हणाले की, कात्रज डेअरीचे पदार्थ दर्जेदार ठेवणेचे काम संघाचे अध्यक्ष व संचालक व अधिकारी करत आहे. मिलिटरीचे कमांड हॉस्पिटल मध्ये सर्व ठिकाणावरून जवान येत असतात. त्याचप्रमाणे मिलिटरी युनिटकरिता कात्रज संघ ब-याच वर्षापासुन दूध पुरवठा करित आहे. असे बोलुन त्यांनी कात्रज संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शेतकऱ्यांचे योगदानामुळे कात्रज दूध संघ चांगल्या प्रकारे कामकाज करत आहेत. कात्रज दूध हा नावाजलेला ब्राण्ड आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात दूध संघाचे नाव पोहचवण्यासाठी प्रयत्न चालु आहेत. कात्रज दूध संघ दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ बनवित असुन त्यांना खुप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याअनुषंगाने पुण्यात तसेच इतर पुण्याबाहेर मिलीटरी युनिटचे सप्लाय डेपोला दूध व दुग्धजन्य पदार्थ पोहोच करणेचा मानस आहे. असे संघाचे अधयक्ष, मा. अॅड. स्वप्निल ढमढेरे साो. या कार्यक्रम प्रसंगी म्हणाले.
संघाचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. मनोज लिमये साो., यांनी सर्वांचे स्वागत केले व दूध वितरण प्रमुख, मा.श्री. हेमंत कदम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
संपाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेबांचे हस्ते कात्रजचे दूध व दुग्धजन्य पदार्थ मिनी मॉलचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करणेत आले होते. सदरचा कात्रज मिनी मॉल आज दि.०३/१०/२०२५ रोजी पासून चोखंदळ पुणेकर ग्राहकांसाठी खुला करणेत आला आहे. कात्रजच्या भेसळविरहीत दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आस्वाद जास्तीत जास्त पुणेकर ग्राहकांनी घ्यावा. असे संघाचे चेअरमन मा. अॅड. स्वप्नील ढमढेरे साो. यांनी आव्हान केले आहे.


















