


Praiinidhi : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन मा. श्री. भगवान पासलकर व व्हाईस चेअरमन मा. श्री. भाऊ धोंडू देवाडे यांनी वैयक्तीक कारणामुळे राजीनामा दिल्यामुळे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाचे निवडीसाठी आज दि. १३/०२/२०२५ रोजी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) मा.श्री. सुधीर खंबायत साो. यांचे अध्यक्षतेखाली संघाचे संचालक मंडळाची सभा झाली.
चेअरमन पदासाठी संचालक मा. अॅड. स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे व व्हाईस चेअरमन पदासाठी मा.प्रा.श्री. मारुती दत्तात्रय जगताप यांचे नाव आले. अन्य कोणाचाच अर्ज नसल्याने अध्यासी अधिकारी मा.श्री. सुधीर खंबायत यांनी मा. अॅड. स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे (BA.LLB) यांची संघाचे चेअरमनपदी व मा.प्रा.श्री. मारुती दत्तात्रय जगताप (BA, B.Com, B.ed (Phy), MPM) यांची संघाचे व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.
नवनिर्वाचित चेअरमन यांचा कामगारांचे वतीने कात्रज मुख्य कार्यालयाच्या आवारातील प्रांगणात सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी बोलताना चेअरमन मा. अॅड. स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे म्हणाले की, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब, मा. आमदार श्री. दिलीपराव वळसे पाटील साहेब, मा. आमदार श्री. ज्ञानेश्वर कटके साहेब, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार व जेष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रदीप गारटकर, यांनी कात्रज दूध संघाच्या अध्यक्ष पदी माझी निवड केली असून ही निवड मी सार्थ ठरवीन तसेच माझे वडील श्री. बाळासाहेब ढमढेरे यांचे चेअरमन होण्याचे स्वप्न होते ते माझ्या रुपाने पूर्ण झाले याचा मी आनंद व्यक्त करतो. मा. श्री. अजितदादा पवार साहेबांचे यांचे मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सर्व संचालकांना बरोबर घेऊन संघाचे दूध संकलन व डिजीटल मार्केटिंग करुन विक्री वाढविणे तसेच एन.डी.डी.बी. (राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड) च्या माध्यमातुन मंजुर डेअरी विस्तारीकरणाच्या प्रकल्पाला गती देऊन अत्याधुनिक स्वयंचलीत प्रकल्प तयार करुन संघाचा नावलौकिकात भर टाकण्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे.
जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अधिकाधिक आर्थिक हित साधण्यास माझे प्राधान्य असेल. असे म्हणाले.
(श्री. मनोज लिमये)
व्यवस्थापकीय संचालक

















