
वृत्तसंस्था : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकार निवडणुकीला उतरणार असल्याच्या चर्चांणा उधाण येते. अभिनेत्री माधुरी दीक्षित मुंबईतून लोकसभेत उतरणार आणि नाना पाटेकर हे खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी इच्छूक असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. एका वृत्तवाहिनीवर बोलताना नाना पाटेकर यांनी राजकारणाबाबत काही मतं व्यक्त केली होती त्यानंतर सदर चर्चा सुरू झाली. याबाबतचा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते, खासदार शरद पवार यांना अमरावती येथे पत्रकारांनी विचारला, त्यावर शरद पवार यांनी एका प्रशनाला उतर दिले.

















