

प्रतीनिधी : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या BBA(CA) विभागा मधील , 15 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या प्रा. रुपाली बाळासाहेब माने आणि प्रा . प्रणिता विश्वानाथ मारोडकर यांना ग्रीन वर्ल्ड व जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या संयुक्तविद्यमाने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले .या कार्यक्रमाच्या प्रसंगी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट चे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर , ग्रीन वर्ल्ड फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष लेखक श्री. गौतम कोतवाल , आयकर आयुक्त मा श्री. अजय केसरी आणि खेड विधानसभा आमदार मा. श्री बाबाजीशेठ काळे तसेच मा. नगरसेवक, संचालक सनी वर्ल्ड मा. सनी निम्हण यांच्या उपस्थितीमध्ये प्राध्यापिका रुपाली बाळासाहेब माने व प्रणिता विश्वानाथ मारोडकर यांनी सतत पंधरा वर्षापासून शैक्षणिक कार्यात आपल्या दिलेल्या योगदानाबद्दल स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या साठी त्यांना प्रा. अजय गाढवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा पुरस्कार म्हणजे शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा ज्ञानाचा मान व सन्मान म्हणून संबोधला जातो. त्यांचे शिक्षणातील योगदान सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार मा. विलास लांडे, सचिव मा .सुधीरशेठ मुंगसे, विश्वस्थ व माजी नगरसेवक विक्रांतदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . के .जी . कानडे , उपप्राचार्य किरण चौधरी, रजिस्टर सौ अश्विनी भोसले -चव्हाण, सर्व विद्याशाखांचे विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग, महाविद्यालयातील सर्व प्रशासकीय कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी या दोन्हीही गुणवान प्राध्यापिकांचे अभिनंदन केले .


















