
२५२५ जूनला पिंपरी चिंचवडमध्ये मनसेच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
पिंपरी चिंचवड – २३ जून २०२५ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, पुणे शहर यांच्या वतीने दिनांक २५ जून २०२५ रोजी “अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, पिंपरी चिंचवड” येथे “भव्य रोजगार व रोजगाराभिमुख प्रशिक्षण मेळाव्याचे” आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र राज्य महेंद्र बैसाणे यांनी दिली. रागा हॉटेल पिंपरी येथे आज (दि.२३) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी सरचिटणीस सिद्धी आंगणे, महेश महाले, मनसे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन चिखले व इतर मनसेचे विविध नेते, पदाधिकारी व आयोजक आदी उपस्थित होते.
यावेळी बैसाणे म्हणाले की, मेळावा सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत पार पडणार असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मेळाव्यास मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, अॅड. गणेश सातपुते, अॅड. किशोर शिंदे, बाळा शेडगे, हेमंत संभूस, रणजीत शिरोळे, अजय शिंदे, प्रवक्ते योगेश खैरे, तसेच पुणे शहराध्यक्ष साईनाथ बायर आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या रोजगार मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे विशेष सहकार्य लाभले असून, पुणे व पिंपरी चिंचवड येथील नामांकित औद्योगिक प्रशिक्षणऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य देखील उपस्थित राहणार आहेत.


















