
आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण चर्चा केली. पक्षासाठी वर्षानुवर्ष झटणारे युवक पदाधिकारी तसेच महिला,विद्यार्थी आणि उर्वरित सेल तसेच संघटनेतील एकनिष्ठ पदाधिकारी यांना महापालिका निवडणुकीत संधी द्यावी अशी मागणी यावेळी आदरणीय पवार साहेबांकडे केली.
यावेळी बोलताना आदरणीय पवार साहेबांनी “पक्षाच्या वतीने शहरातील सर्व जागा लढवायच्या असून यावेळी नवीन चेहरे उमेदवार म्हणून दिसतील.तसेच पक्ष संघटनेतील एकनिष्ठ पदाधिकारी आणि युवकांना अधिकची संधी देणार असल्याचे आदरणीय पवार म्हणाले”
यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश आप्पा मस्के, वृक्षमित्र अरुण भाऊ पवार,युवक पदाधिकारी रजनीकांत गायकवाड, प्रशांत जाधव आणि उद्योजक तांबे सर उपस्थित होते.


















