पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या z क्र. २८ मधील पिंपळे सौदागर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून, या परिसरात मोठ्या निवासी इमारती व गृहप्रकल्पांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठ्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत असून, भविष्यात नागरिकांना पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.
सदर परिसरातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षण क्र. ४/११२ (खेळाचे मैदान – PG) या आरक्षित जागेमधून सुमारे १५ ते २० गुंठे जागा उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी २.५ एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा जलकुंभ उभारणे आवश्यक आहे.
सदर जलकुंभाची उभारणी झाल्यास पिंपळे सौदागर परिसरातील वाढत्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठा करण्यास मदत होईल. तसेच भविष्यातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
तरी, पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन, सदर जागेची पाहणी करून नियमानुसार आवश्यक मंजुरी व तांत्रिक कार्यवाही पूर्ण करावी आणि जलकुंभ उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित आवश्यक ते आदेश द्यावेत














