” अवयव दान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती”
— पद्मश्री गिरीश प्रभुणे
आकुर्डी – आंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त गुणवंत कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अवयव दान जनजागृती कार्यक्रम तसेच महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त झालेल्या गुणवंत कामगारांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र , उद्योग नगर येथे (गुरुवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२६) करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. भारती चव्हाण होत्या. प्रमुख पाहुणे पद्मश्री गिरीश प्रभुणे, अवयव दान जनजागृती करणारे व्याख्याते श्रीकांत आपटे , महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे होते.
याप्रसंगी माजी केंद्रप्रमुख सुरेश पवार, , कार्याध्यक्ष तानाजी एकोंडे, राजेश हजारे , महेंद्र गायकवाड, सुरेश कंक, अण्णा गुरव, उद्धव कुंभार, भरत शिंदे,श्रीकांत कदम, प्रकाश चव्हाण, शंकर नाणेकर, अशोक सरतापे, शिवाजी पाटील या गुणवंत कामगारांची प्रमुख उपस्थिती होती.
पद्मश्री गिरीश प्रभुणे यावेळी म्हणाले.. ” अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आणि विद्यादानापेक्षा अवयव दान आधिक श्रेष्ठ आहे.
अवयव दान करणे म्हणजे खरी मोक्षप्राप्ती आहे. गुणवंत कामगारांनी व्यापक मोहीम राबवून अवयव दान जनजागृती करावी.”
व्याख्याते श्रीकांत आपटे म्हणाले.. “मृत्यूनंतर अवयव दान केल्याने एक जीव वाचतो. मग ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे ‘ हे वाक्य सार्थ ठरते. अवयव दाना विषयी समाजात असलेली अंधश्रद्धा निपटून काढणे अन् सकारात्मक प्रचार करणे हे कार्य गुणवंत कामगारांनी करावे.!
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे म्हणाले.. “गुणवंत कामगारांनी आगामी काळात अधिक जोमाने काम करणे अपेक्षित आहे. यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ निश्चित सहकार्य करेल.!”
गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. भारती चव्हाण म्हणाल्या..
” गुणवंत कामगारांनी सर्वसामान्य माणसांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असावे. अवयव दान हा विचार कृतीत येण्यासाठी प्रचार अन् प्रसार करणे याची सुरुवात आपल्यापासून करणे आवश्यक आहे.!”
विशेष कार्यकारी अधिकार पदी नियुक्त झालेले गुणवंत कामगार
वसंत कोल्हे, काळूराम लांडगे, किरण देशमुख, बाळासाहेब साळुंके, शिवाजी पाटील, दत्तात्रय गायकवाड यांचा स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
संदीप रांगोळे,पांडुरंग सुतार, डी पी देशपांडे, अरुण कळंबे, अक्षय काटे, कैलास पाटील, मुस्तफा मुलानी, संतोष कोरडे, नंदकुमार धुमाळ, सुरेश शेडगे, धनंजय सावंत, रवी मेश्राम
यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
प्रास्ताविक गुणवंत कामगार महंमद शरीफ मुलानी यांनी केले. बहारदार सूत्रसंचालन शिवराज शिंदे यांनी केले. तर आभार गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी मानले













