
- वाहतूक कोंडी, अपुऱ्या नागरी सुविधा आणि दुराव
- स्थेवर कायमचा उपाय आवश्यक!
- पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:हिंजवडीसारख्या अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी आता ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असे मत चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हिंजवडीचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत झाला पाहिजे!”हिंजवडीमधील सध्याची स्थिती चिंताजनकहिंजवडी परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, माहिती तंत्रज्ञान उद्यानात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, अपुऱ्या नागरी सुविधा आणि अनियोजित वाढ यामुळे आयटी कर्मचारी, स्थानिक रहिवासी तसेच उद्योजक वर्ग हैराण झाले आहेत. या सगळ्याचा थेट परिणाम परिसरातील जीवनमानावर होत आहे.#UNCLOGHinjawadiITPark आंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद
या पार्श्वभूमीवर वाकड-पिंपरी चिंचवड रहिवासी विकास व कल्याण संघाचे अध्यक्ष श्री. सचिन लोंढे यांनी #UNCLOGHinjawadiITPark या नावाने जनआंदोलन सुरू केले असून, हिंजवडीचा पीसीएमसीमध्ये समावेश व्हावा, यासाठी ऑनलाईन स्वाक्षरी अभियान चालवले जात आहे. या अभियानास अल्पावधीतच हजारोंचा प्रतिसाद मिळत आहे.
पीसीएमसीमध्ये समावेश झाल्यास काय फायदे होतील?
- रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व देखभाल
- वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा
- पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता यासारख्या नागरी सुविधा अधिक सक्षम
- आयटी कर्मचारी व स्थानिक रहिवाशांना दिलासा
- एकूणच या भागाचा नियोजनबद्ध व शाश्वत विकास
नाना काटेंचा ठाम पाठिंबा
नाना काटे यांनी या मागणीला ठाम पाठिंबा दिला असून नागरिकांनाही पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. “आपल्या एका स्वाक्षरीमुळे हिंजवडीच्या उज्ज्वल भविष्यास चालना मिळू शकते. नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे काटे यांनी म्हणाले.
हिंजवडीच्या नागरी हक्कांसाठी ही लढाई फक्त आयटी कर्मचाऱ्यांची नाही, तर संपूर्ण परिसराच्या भल्याची आहे. अधिक सुविधा, शाश्वत विकास आणि जीवनमानात सुधारणा हाच यामागचा मुख्य हेतू आहे.


















