पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील शिवप्रेमी, थेरगावचे सुपुत्र, साहित्यिक व राजकीय नेते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी साहित्य व ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
संभाजी बारणे यांनी यापूर्वी २०१९ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींच्या विजिटिंग कार्डचे संकलन करून विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांच्या या अनोख्या संकलनाची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली होती.
त्यानंतर २०२६ मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवचरित्राच्या तब्बल ६०० पुस्तकांचे संकलन करून पुन्हा एकदा आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाचीही इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली













