
महापौर रवि लांडगे यांचा बाकू दौराही रद्द
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिकेत पदाधिकाऱ्यांना दरमहा ₹५० हजार इंधन भत्ता देण्याच्या प्रस्तावावरून निर्माण झालेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. संबंधित प्रस्ताव यापूर्वीपासूनच पुनर्विचाराधीन होता आणि तो अधिकृतरीत्या मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शहराचे महापौर रवि लांडगे यांनी आपल्या X हॅडलवर दिली आहे. येत्या १५ मे २०२६ रोजी होणाऱ्या महासभेच्या इतिवृत्तात या निर्णयाची अधिकृत नोंद करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाला महायुतीतील सेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून हरताळ?’’ या मथळ्याने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही याबाबत X हँडलवर भूमिका मांडली होती. त्याची दखल महापौर कार्यालय आणि प्रशासनाने घेतली आहे. वास्तविक, शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक संतोष कोकणे यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. स्थायी समितीने हा प्रस्ताव मुख्य सभेत पाठवला. हा प्रस्ताव अजेंड्यावर होता. याबाबत वृत्तांकन केल्यानंतर महापौरांनी हा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
















