रहाटणी : पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ तोंडावर असताना प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार प्रमुख व माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी अचानक आणि आक्रमक राजकीय चाल टाकत भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे. माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या पत्नी अनिता कैलास थोपटे यांना उमेदवार म्हणून पुढे करत राष्ट्रवादीने केवळ उमेदवारी जाहीर केली नाही, तर संपूर्ण प्रभागातील सत्ता-समीकरणांनाच धक्का दिला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना घेतलेला हा निर्णय म्हणजे राष्ट्रवादीचा थेट ‘मॅच-विनिंग मूव्ह’ असल्याचे मानले जात आहे. कारण रहाटणी–काळेवाडीच्या राजकारणात कैलास थोपटे हे नाव आजही मतदारांमध्ये विश्वासाचं आणि कामाचं प्रतिक मानले जाते. सलग दहा वर्षे प्रभागाचे नेतृत्व, रस्ते–पाणी–ड्रेनेजपासून नागरिकांच्या दारात पोहोचणारी कामे, आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद ही त्यांची ओळख आजही ताजी आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या लाटेत त्यांचा निसटता पराभव झाला असला, तरी थोपटेंची पकड सुटलेली नाही, हेच या उमेदवारीतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
भाजपमध्ये उमेदवारीवरून यादवी, राष्ट्रवादीला आयते बळ
काल दिवसभरात प्रभाग २७ मध्ये घडलेल्या दोन मोठ्या घडामोडींनी भाजपची अंतर्गत फाटाफूट चव्हाट्यावर आणली. भाजपकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी नाना काटे यांची भेट घेऊन “ भाजपने पुन्हा त्याच नगरसेवकाला उमेदवारी दिली” या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांच्या समक्ष प्रतिज्ञा करत राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. या सर्व इच्छुकांनी एकमुखी राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर करत भाजपला धक्का दिला, त्यामुळे प्रभागात भाजपची संघटनात्मक पकड सैल होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.