
प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी विभाग पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) वतीने शरातील पदाधिकारी यांची नियुक्ती शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मार्गदर्शनात माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते तसेच कार्याध्यक्ष फजल शेख, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड.सचिन औटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुतन कार्यकारिणी पद वाटप समारंभ मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी,पिंपरी येथे पार पडला, यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, संघटन सचिव अशी पदे देण्यात आली असून, ओबीसी विभागाचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची पक्षास मिळाली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षश्रेष्ठींकडून अभिनंदन करण्यात आले आहे. आगामी काळात जनसंपर्क वाढवणे आणि पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे, असा निर्धार यावेळी सर्व पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती ओबीसी शहर अध्यक्ष प्रशांत महाजन यांनी यावेदिली सोबत :
















