
पम्तीनिधी : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी, पुणे ३९ . येथील स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आज गुरुवार दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी मा. सौ. सुस्मिता नरेंद्र तावटे उपसंचालक, कृषी आयुक्तालय, शिवाजीनगर पुणे यांचे ” स्पर्धा परिक्षांची ओळख ” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की, महाविद्यालयीन जीवनामध्येच स्पर्धापरिक्षेच्या तयारीला सुरुवात केली तर यशाचा मार्ग अधिक सुकर होतो . स्पर्धापरिक्षा पास होणे हा पहिला टप्पा आहे. स्पर्धापरिक्षा पास झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होते तेव्हा प्रमाणिक कामामधून समाधान मिळते. त्यांनी स्वानुभवातून सर्व विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . के. जे. कानडे हे होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तयार करत असताना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील .प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे . ध्येयपुर्ती साठी महाविद्यालय कटिबद्ध आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या . स्पर्धापरीक्षांबरोब सीए, सीएस, पोलिस भरतीसाठी ही महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घेणे आवश्यक आहे. भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार आणि राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विलास लांडे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी , कला शाखाप्रमुख डॉ. श्रेया दाणी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अनिल गंभीरे, रासेयो अधिकारी डॉ. सुग्रीव आडाल, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. कमलेश जगताप, व्यवस्थापन विभागप्रमुख प्रा. सारिका जगताप, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. जयश्री आरमनी, बीसीए (सी.एस) विभागप्रमुख प्रा. रूपाली माने, आदी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख व कार्यक्रम समन्वयक डॉ. दीपक पावडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश चव्हाण यांनी मानले .


















