
मा. कार्यकारी अभियंता
महावितरण, पिंपरी विभाग,
पिंपरी पुणे .
प्रंतीनीधी : नव्याने बसविण्यात आलेल्या डीजीटल मीटरमुळे येणाऱ्या वाढीव बिला संदर्भातील नागरिकांच्या तक्रारी दूर करणे बाबत.
महोदय,
वरील विषयानुसार रहाटणी पिंपळे सौदागर येथील बहुतेक सोसायटी व बैठी घरांमध्ये महावितरणच्या वतीने नवीन डिजिटल वीज मीटर बसविण्यात आलेले असून, ही चांगली बाब आहे परंतु मीटर बंद असून देखील सुद्धा नागरिकांना रीडिंग न घेता अव्वाचा सव्वा अंदाजे रीडिंग चा दर आकारून बिल देत आहे व त्यातून नागरिकांची आर्थिक लूट होत आहे अश्या तक्रारी येथील नागरिक लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्याकडे करत आहे ही खूप गंभीर बाब असून, याबाबत नागरिकांनी आपल्या महावितरण विभागाकडे तक्रार केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात व तुमचे बिल बरोबर आहे व तुम्हाला हे बिल भरावेच लागेल असे सांगून त्यांच्याकडून हे बिल वसूल केले जाते, अशाने नागरिकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे,
तरी मा. कार्यकारी अभियंता साहेब वरील नागरिकांच्या समस्सेकडे पाहता ही खूप विचारपूर्वक बाब असून नागरिकांच्या तक्रारीकडे यामध्ये आपण लक्ष देवून त्वरित कार्यवाही करावी व या त्रासातून नागिरकांना सोडवावे ही विनंती.


















