
प्रतिनिधी : *वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे —–*
*पक्षी ही सुस्वरे आळविती —-*
*विश्वगुरू जगद्गुरु श्रेष्ठसंत तुकाराम महाराज*
नवरात्र उत्सवामध्ये नवरात्र महोत्सव यानिमित्त पिंपळेगुरव,नवीसांगवी या ठिकाणी आणि असे बरेच पिंपरीचिंचवड मधील माता भगिनींना नवरात्र उत्सवामध्ये आणि मराठवाडा जनविकास संघ मुख्य कार्यालय या ठिकाणी ही वृक्षदान पिंपळ ,वड , कडुलिंब , चिंच , नारळ , पेरू , चिकू , रामफळ कनेरी मोगरा जास्वंदी , गुलाब , असे अनेक प्रकारचे झाडे वाटप करण्यात आले मराठवाडा जनविकास संघ पिंपरी-चिंचवड शहर,पुणे श्री.छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्षमित्र महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त आणि समाज भूषण पुरस्कार प्राप्त अरुण पवार यांच्या वतीने नवरात्र उत्सवामध्ये 500 झाडांचे वृक्षदान या मोहिमे अंतर्गत वाटप करण्यात आले
या पाठीमागचा एवढाच उद्देश आहे मानव आणि निसर्ग यांचा संबंध हा प्राचीन काळापासूनचालत आलेला आहे. निसर्गातूनच माणसाचा जन्म झालायआणि याच निसर्गातून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात.निसर्गात माणसाला आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊ लागली. त्यामुळे मनुष्याचे जीवन जगणे सोपे झाले. तसेच या निसर्गातील सर्वात मोठी देणगी म्हणजे झाड. झाडे आहेत म्हणून आज आपण या पृथ्वीतलावर सुखरूप राहू शकतो. कारण या झाडांपासून आपल्याला जीवनावश्यक प्राणवायू मिळतो. माणसाच्या जीवनात झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.झाडे लावा झाडे जगवा देश वाचवा पृथ्वी वाचवा मनुष्य जीवसृष्टी वाचवा प्राणीमात्रा वाचवा.तसेच नवरात्र उत्सवामध्ये नवरात्र महोत्सव यानिमित्त संत ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी ग्रंथ ही वाटप करण्यात आले आणि एकनाथी भागवत हस्तलिखित नवरात्र उत्सवामध्ये ग्रंथही वाटप करण्यात आले.


















