
प्रतिनिधी : शंकराव मोहिते पाटील स्कूल & ज्युनियर कॉलेज अकलूज जि.सोलापुर येथे झालेल्या शालेय विभागस्तरीय क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांच्या गटात राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील मुलांच्या संघाने पिंपरी चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व करत अंतिम सामन्यात सोलापूर ग्रामीण संघाचा पराभव करून सलग चौथ्यांदा विजेतपद मिळवले.राजमाता जिजाऊच्या मुलांच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी स्विकारत पुणे शहर या संघाने 12 ओव्हर मध्ये 07 बाद 58 धावांचे आव्हान देण्यात आले त्याच प्रतिउत्तर देताना राजमाता जिजाऊंच्या संघाने 8.2ओव्हरमध्ये नाबाद 59 सहज धावा पुर्ण करत राजमाता जिजाऊ च्या रोमहर्षक विजय मिळवून सलग चौथ्यांदा विजेतेपद संपादन केले त्यामध्ये फलंदाजी मध्ये यश बर्गे नाबाद 38 धावा, प्रज्वल पवार नाबाद 21 धावा यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली व त्यांना राजवर्धन शितोळे 3 विकेट, चंद्रास, भालघरे 1 विकेट,आयुष भापकर 1 विकेट यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.त्यापुर्वी झालेल्या उपांत्य फेरीत सोलापूर शहरचा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.त्यात चैतन्य कोंडभर, ओकांर जाधव,अथर्व पवार, यश बर्गे उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला एकतर्फी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 17 वर्षाखालील मुलांच्या संघात कु.अथर्व पवार, पियुष इंगवले, मिहिर कापसे, बाबासाहेब कसबे, चैतन्य पाटील, झैद अन्सारी, सौरभ दौंड, प्रज्वल पवार, राजवर्धन शितोळे,आयुष भापकर,ओंकार जाधव,चंद्रास बालघरे,.चैतन्य कोंडभर, यश बर्गे , पारस चव्हाण व ऋषिकेश शिंदे या सर्व खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे या सर्व विजेत्या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा.गोपीचंद करंडे व प्रशिक्षक दत्तात्रेय वाळके यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे सर, विश्वस्त व नगरसेवक विक्रांतदादा लांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.


















