
प्रतिनिधी : कर्नाटक चा निकाल बघता बजरंग बली हे अन्याय विरोधात कायम सत्या सोबत राहिल्याचे रामायण सांगते…
त्यामुळे जाती-धर्मा वरून समाज तोडणाऱ्या भाजपला बजरंग बली पावण्याचा विषयच येत नाही असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी कर्नाटकात भाजपचे पराभवानंतर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे
देशाच्या जनतेने ठरवले तर मीडिया द्वारे केला गेलेला आक्रमक प्रचार, चित्रपटाद्वारे पेरला गेलेला विखार, खोटे बोल पण रेटून बोल ची नीती, सरकारी यंत्रणांचा केलेला दुरुपयोग सर्व काही निष्प्रभ ठरून सत्याचा विजय होऊ शकतो. त्याच प्रमाणे एकदा जनतेने विकासावर मतदान करायचे ठरवल्यावर बी टीम,सी टीम, ते झेड टीम सर्वांचा बाजा वाजू शकतो हा कर्नाटकातील जनतेने देशाला दिलेला कौल आहे.
विरोधी पक्ष एकत्र आले तर धर्माच्या नावा खाली देश विकणारे,द्वेष पसरवणारे कुठेही टिकू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले..


















