
नवी सांगवीतील संस्कृती लॉन्स येथे ६ डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी, प्रतिनिधी :पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने जगदगुरू व्दाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ६ डिसेंबर रोजी अभिष्टचिंतन सोहळा, तसेच कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य अशा ७५ महाराजांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
हा सत्कार समारंभ नवी सांगवीतील संस्कृती लॉन्स येथे सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, गणेश सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय जगताप, गो सेवक विजय जगताप यांनी दिली.
कार्यक्रमाचे उदघाट्न जगतगुरु श्रीमद् शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारतीजी महाराज (करवीर पीठाधिश्वर) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शंकर जगताप असणार आहेत. दरम्यान, सकाळी ९ ते ११ या वेळेत भागताचार्य ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांची कीर्तनसेवा पार पडणार आहे.
कार्यक्रमाला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, आमदार शंकर जगताप, आमदार शंकर मांडेकर, माजी नगरसेवक आप्पासाहेब रेणुसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेविका स्वाती (माई) काटे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर करणार आहेत.
















