- दोन वेळा बिनविरोध नगरसेवक ते दिल्लीतील लॉबिंग; पुढचे लक्ष्य विधानसभा?..
- महापौर रवि लांडगे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्याने राजकीय चर्चांना उधाण… रवि लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आणि सध्या शहराचे महापौर आहेत. दुसरीकडे, त्याच मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचेही पक्षात मजबूत स्थान आहे. अशा परिस्थितीत महापौरांचा स्वतंत्र दिल्ली दौरा आणि केंद्रीय मंत्र्यांशी सलग बैठका याकडे केवळ प्रशासकीय उपक्रम म्हणून पाहायचे की त्यामागे स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख अधिक ठळक करण्याचा प्रयत्न आहे, याची चर्चा स्वाभाविक आहे.
- भाजपमध्ये संघटनात्मक शिस्त आणि नेतृत्वाची स्पष्ट रचना असते. त्यामुळे पक्षातील कोणताही नेता मोठ्या प्रमाणावर केंद्रीय पातळीवर संपर्क साधत असेल, तर त्याकडे केवळ औपचारिक भेट म्हणून पाहिले जात नाही. विशेषतः विधानसभेच्या राजकारणाची चाहूल लागलेली असताना अशा प्रत्येक हालचालीचे राजकीय अर्थ लावले जातात. भोसरीअर्थात, या दौऱ्यातील सर्व बैठका विकासाच्या मुद्यांवर झाल्या, असे अधिकृतपणे सांगितले गेले आहे. मात्र, भारतीय राजकारणात विकास आणि राजकारण हे अनेकदा समांतर चालत नाहीत, तर एकमेकांना पूरक ठरतात. दिल्लीतील भेटी केवळ विकासाच्या फायली पुढे सरकवण्यासाठी होत्या की भविष्यातील राजकीय समीकरणांचीही नांदी ठरतील, याचे उत्तर काळच देईल.
- आजची वस्तुस्थिती अशी आहे की भोसरीत भाजपचे नेतृत्व महेश लांडगे यांच्याकडे आहे. पण त्याच मतदारसंघातून महापौर म्हणून रवि लांडगे यांची वाढती दृश्यमानता आणि केंद्रीय नेतृत्वाशी वाढणारा संपर्क हा केवळ योगायोग आहे की पुढील राजकीय वाटचालीची नियोजनबद्ध सुरुवात, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. कदाचितदिल्लीत विकासाचा रोडमॅप मांडला गेला… की भविष्यातील राजकीय रोडमॅपही आखला गेला? याचे उत्तर आगामी काळातील भाजपच्या राजकीय घडामोडींमध्येच दडलेले असेल.













