
मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ‘‘टायगर भोसरी विधानसभेचे प्रथमआमदारविलास लांडे यांची जिल्हा निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती!
Br news : शहरातील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आणि मुत्सद्दी नेता म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार विलास लांडे यांनी राजकीय तुलनेत ज्युनिअर असलेल्या योगेश बहल यांच्या कार्यकारिणीत काम करायला लावणे, ही राष्ट्रवादीची ‘‘विनाशकाले विपरित बुद्धी’’ आहे. लांडे यांना हेतुत: राजकीयदृष्ट्या ‘‘साईड रोल’’ दिला जात आहे का? असा सवाल उपस्थित करणारे परखड राजकीय विश्लेषण ‘‘महाईन्यूज’’ च्या माध्यमातून दि. 13 राजकारणात चांगलीच चर्चा झाली. किंबहुना, लांडे यांच्यावर अन्याय होतो आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जावू
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभावी नेता हवा. जो भाजपाशी दोन हात करु शकेल, असे भाष्यही ‘महाईन् त्याला मूर्तस्वरुप आले. दि. 14 नोव्हेंबर रोजी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची ‘‘प्रचार प्रमुख’’ पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विलास लांडे यांना ‘‘जिल्हा समन्वयक’’ म्हणून मैदानात उतरवण्यात आले.
जगताप- लांडगे यांच्या विरोधात काटे-लांडे यांची जोडी..!
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा प्रमुख प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीच्या ‘‘जिल्हा निवडणूक प्रभारी’’पदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती केली आहे. त्यानंतर पुणे दक्षिण आणि पुणे उत्तर असे भाजपाचे दोन संघटनात्मक संरचना आहेत. त्यामध्ये पुणे दक्षिण जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आमदार राहुल कुल आणि पुणे उत्तर जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आमदार शंकर जगताप आहेत.
राष्ट्रवादीच्या संघटनात्मक संरचनेमध्ये निवडणूक प्रभारीला समांतर निवडणूक समन्वयक आहेत. भाजपाला आव्हान देण्यासाठी आता प्रचार प्रमुख म्हणून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि पिंपरी-चिंचवड जिल्हा समन्वयकपदी माजी आमदार विलास लांडे यांना जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपासमोर तगडे आव्हान होवू शकते, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.


















