
प्रतीनिधी : समाजातील अडचणीच्या काळात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हि केवळ जबाबदारी नसून सेवाभाव आहे आपल्या संस्थेच्या नावातच सेवाभाव आहे.
सध्या मराठवाड्यातील बीड बार्शी धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यातील पुरग्रस्तांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे
पुरग्रस्त नागरिक हे समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे असे समजून आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या व त्यांच्या पाल्यांच्या वेदना कमी करण्यासाठी एक हात मदतीचा या म्हणीप्रमाणे केंद्रीय प्राथमिक विद्यालय आंबी ता.भुम जि.धाराशिव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना अंदाजे १५० ते १६० शालेय किटचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम पार पडल्यानंतर लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला आमच्या जीवनाच सार्थक झाल्यासारखे वाटले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.अंकुश निवळकर, तसेच श्री.नाना माखले, श्री.संतोष गवते श्री, अमोल जाधव श्री.नेताजी आडबळे श्री.राहुल मोटे श्री.गिलबीले साहेब श्री.जगताप साहेब व आंबी गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बालचमु यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

















