
पप्रतीनीघी ं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री पुणे जिल्हा मा. अजितदादा पवार साहेब यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमीत्त पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज पुणे यांच्या मार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रम दि. ७ जुलै २०२५ पासून ते दि.३१ जुलै २०२५ पर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
सदर शिबीरामध्ये दूध उत्पादकांच्या जनावरांची तपासणी केली जात असून त्यामध्ये जनावरांच्या आजाराचे निदान केले जात आहे. तसेच जंतमार व गोचीडमार औषधे संघामार्फत शिबीराच्या ठिकाणी मोफत वाटप करण्यात येत आहे. संघाच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या इनपुट विभागाच्या विविध सेवा-सुविधां बाबत माहिती दिली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने संघ निर्मीत कात्रज पशुखाद्य (कात्रज १०, कात्रज २०, कात्रज २० प्लस, कात्रज काल्फ स्टार्टर), कडबा कुट्टी मशिन, मिल्किंग मशिन, मिनरल मिक्चर, चारा बि-बियाणे, मुरघास बंग, कृत्रिम रेतन सुविधा, पशुवैद्यकीय औषधे, आयव्हीएफ सेवा, जंतनिर्मूलन, स्वच्छ दूध उत्पादन व सेंद्रीय खते याबाबत गावपातळीवर संघाची सभासद दूध संस्था व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यावर माहिती दिली जात आहे.
सदर शिबीराचा लाभ दूध उत्पादन वाढीसाठी व जनावरांना हानीकारक असलेल्या जंत व गोचीड निर्मूलनासाठी होणार असल्याचे प्रतिपादन यासमयी संघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोज लिमये यांनी केले. कार्यक्रमाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा व्हावा या उद्देशाने संघाचे चेअरमन मा. अॅड. स्वप्नीलदादा ढमढेरे साो. यांनी संपूर्ण पुणे जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्याचा दृष्टीने जिल्ह्यामध्ये ३ टीम तयार केलेल्या आहेत. मा. अजितदादा पवार साहेब यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमीत्त ८५ दूध उत्पादक संस्थांच्या शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी मोफत आरोग्य शिबीर घेण्याचा त्यांचा मानस आहे.
आजपर्यंत सदर शिबीर गोडेगाव, बेंढारवाडी ता. आंबेगाव, जाधवमळा, उंचखडक, पिंपळवंडी, गायमुखवाडी, मांजरवाडी, गडाचीवाडी व हिवरे ता. जुन्नर, वाडा, डेहणे, खेड व सातकरवाडी ता. खेड, खानापूर, हातनोशी, बरवडी, उत्रोली, चिखलावडे, गोळेवाडी, म्हसवली, नांद पांगारी ता. भोर, वाटलुज, पारगाव व नांगरेवाडी ता. दौंड, माहुर व वाल्हे, ता. पुरंदर, मलठण व घोलपवाडी ता. शिरुर, आर्वी व उरुळीकांचन ता. हवेली तसेच विंझर ता. राजगड (वेल्हा) या तालुक्यामध्ये यशस्विरित्या राबविण्यात आले आहे. सदर शिबिरांना शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमणात हजेरी लावून उस्फुर्त प्रतिसाद दिला व आपल्या जनावरांकरिता मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे.
या कार्यक्रमाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा व दूध उत्पादनातले बारकावे समजून स्वच्छ दूध उत्पादन करणेबाबत प्रेरीत व्हावे असे अवाहन या प्रपप्रसगीकेले


















