
प्रतीनिधीः पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे वतीने अवसरी खुर्द तांबडे मळा येथे लोकआग्रहास्तव नविन अद्ययावत कात्रजच्या दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या पार्लरचे उद्घाटन करण्यात आले.
आमदार श्री. दिलीपराव वळसेपाटील साो. माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते पार्लरचे उद्घाटन करणेत आले. याप्रसंगी माजी खासदार मा. श्री. शिवाजीराव आढळराव पाटील साो. अध्यक्ष, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा, मा. सौ. प्राजक्ता विजय तांबडे सरपंच, तांबडेमळा, संघाचे अध्यक्ष मा. अॅड. स्वप्नील दमढेरे सो. उपाध्यक्ष मा. श्री. मारुती जगताप साो., माजी अध्यक्ष व संचालक मा. श्री. विष्णु हिंगे सारे., मा. श्री. बाळासाहेब खिलारी साो., मा. श्री. अरुण चांभारे साो., मा. श्री. भाऊ देवाडे सारे., मा. सौ. लताताई गोपाळे साो., मा. श्री. निखील तांबे साो., व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोज लिमये, तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
आमदार श्री. दिलीपराव वळसेपाटील साो. म्हणाले की, कात्रज डेअरीचे पदार्थ दर्जेदार ठेवणेचे काम संघाचे अध्यक्ष व संचालक व अधिकारी करत आहेत. उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवणे हाच एकमेव पर्याय आहे. भविष्यात आपल्यासमोर खुप सारी आव्हाने येणार आहेत. संचालक मंडळाने त्या पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. मार्केटमध्ये खाजगी क्षेत्राचे वर्चस्व वाढत चालले आहे त्यामुळे खुप मोठी स्पर्धा चालु आहे. या स्पर्धेत टिकणेसाठी दूधाचे संकलन वाढविणे गरजेचे आहे. पुण्याप्रमाणेच कात्रज दूध व दुग्धजन्य पदार्थ मुंबईमध्ये सुद्धा गेले पाहिजेत कारण मुंबई मार्केट खुप मोठे आहे. असे बोलून त्यांनी कात्रज दूध संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
माजी खासदार मा. श्री. शिवाजीराव आढळराव पाटील साो. म्हणाले की, कात्रज दूध संघ हा आदर्श सहकारी संस्था आहे. कात्रज दूध संघ हा शेतकऱ्यांचा विश्वासू संघ आहे. भविष्यात कात्रजचे प्रॉडक्ट महाराष्ट्राच्या बाहेर तसेच परदेशात गेले पाहिजेत. कात्रज डेअरीने दुग्धजन्य पदार्थ निर्यातीसाठी प्रयत्न करावेत. या कामी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मी सहकार्य करेल. असे बोलून त्यांनी कात्रज दूध संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गेल्या ५० वर्षांमध्ये मा. श्री. वळसेपाटील साहेबांचे सहाय्य व शेतकऱ्यांचे योगदान यामुळे कात्रज दूध संघ चांगल्या प्रकारे कामकाज करत आहेत. कात्रज दूध हा नावाजलेला ब्राण्ड आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात दूध संघाचे नाव पोहचवण्यासाठी प्रयत्न चालु आहेत, कात्रज दूध संघ दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ बनवित असुन त्यांना खुप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ठिकठिकाणी पार्लर सुरु करुन तरुणांना व शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. असे संघाचे अध्यक्ष मा. अॅड. स्वप्नील ढमढेरे साो. या कार्यक्रम प्रसंगी म्हणाले.
संचालक मा. श्री. विष्णु हिंगे साो. यांनी सर्वांचे स्वागत केले व मा. श्री. भाऊ देवाडे साो. यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.


















