
पिंपरी – भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी चिंचवड विधानसभेतील अपक्ष उमेदवार नाना काटे यांना शुभेच्छा दिल्या.
अपक्ष उमेदवार नाना काटे यांनी आज माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी नखाते यांनी त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन ही केलं.
माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, संतोष कोकणे, राज तापकीर आदी यावेळी उपस्थित होते. नखाते यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी करत जगतापांच्या घराणेशाहीला विरोध केला होता.
आज नाना काटे आणि चंद्रकांत नखाते यांच्यात झालेल्या सदिच्छा भेटीने चिंचवड मध्ये नवीन चर्चा रंगल्या आहेत.


















