
प्रातिनिधि : दि. १६/०९/२०२४ रोजी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच कात्रज डेअरीने सदाशिव पेठ, टिळक रोड येथे लोकआग्रहास्तव नविन अदयावत पार्लर सुरु केले आहे.
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील चोखंदळ ग्राहकांची असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन नविन पार्लरचा शुभारंभ करणेत आला. या पार्लरमध्ये कात्रज डेअरीने दूध, मिठाई, आईस्क्रीम, मस्तानी व इतर दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत.
पार्लरचे उदघाटन संघाचे अध्यक्ष श्री. भगवान पासकर सो. शुभहस्ते करणे आले. या प्रसंगी संघाचे अध्यक्ष. श्री. भाऊ देवाडे सो., जेष्ठ संचालक मा. श्री. गोपाळ म्हस्के सो., मा. श्री. बाळासाहेब नेवाळे सो., मा. सौ. केशरताई पवार सा., मा. श्री. राहुल दिवेकर सो., मा. श्री. कालिदास गोपालघरे सो., मा. श्री. चंद्रकांत भिंगारे सो., मा. सौ. लताताई गोपाळे सो., व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोज लिमये, तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
पार्लरचे उदघाटन प्रसंगी संघाचे अध्यक्ष मा. श्री. भगवान पासलकर साो. यांनी सांगितले की, कात्रज डेअरी ही पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संस्था म्हणून काम करत आहे. डेअरीच्या नफ्यातील मोठा भाग हा शेतकऱ्यांना दिला जातो. सहकार तत्वावर चालणारी ही संस्था दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्ता आणि शुध्दतेला प्राधान्य देत असते. त्यामुळे पुणेकर ग्राहकांनी कात्रजच्या भेसळविरहीत दूध व दुग्धजन्य पदार्थांचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यावा असे आवाहन केले आहे.


















