
पिंपरी : सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीत २७ नोंदणी (सह दुय्यम निंबधक) कार्यालये आहेत. त्यापैकी, पिंपरी-चिंचवडमध्ये एकुण ६ सह दुय्यम निंबधक कार्यालये असून पुणे शहरात २१ सह दुय्यम निंबधक कार्यालये आहेत. सह दुय्यम निंबधक कार्यालयाची संख्या त्या तुलनेत फारच अपुरी आहे. त्वरित नवीन कार्यालये वाढविण्याची मागणी अॅड. बाळासाहेब ता. थोपटे यांनी नोंदणी महानिरीक्षक, नवीन प्रशासकीय इमारत, कौन्सील हॉलसमोर, पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील सध्याची लोकसंख्या ही ७० लाखापेक्षा जास्त आहे. तसेच, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाचे जवळपासच्या परिसरातील म्हणजेच हवेली तालुक्यातील गावांची लोकसंख्या सुध्दा फार मोठया प्रमाणात आहे. सदर गावातील दस्त नोंदणी ही याच नोंदणी कार्यालयात होत असते. त्यामुळे सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीत असलेली २७ नोंदणी (सह दुय्यम निंबधक) कार्यालये अतिशय अपुरी पडत असून त्यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे. एका नोंदणी कार्यालयाची एक वर्षाची क्षमता शासन नियमानुसार ८००० दस्त नोंदणी इतकी आहे. प्रत्यक्षात सर्वच नोंदणी कार्यालयात दुपटीपेक्षा जास्त दस्त नोंदविले जात आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील सर्वच नोंदणी (दुय्यम निंबधक) कार्यालयात दिवसभर गर्दी असते. त्यामुळे करोडो रूपये कर भरणाऱ्या नागरिकांना अनेकवेळा दिवसभर थांबुन सुध्दा दस्त नोंदणी होत नाही. अशी परिस्थीती सध्या आहे. परिणामी, नागरिकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीत आणखी २७ नोंदणी (दुय्यम निंबधक) कार्यालये तातडीने होणे अतिशय आवश्यक आहे.
– ऍड, बाळासाहेब थोपटे
टिप – प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.
१. मा. जिल्हाधिकारीसाहेब, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे – १.
२. मा. सह जिल्हा निंबधक व मुद्रांक जिल्हाधिकारी, नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला, विधान भवनासमोर, पुणे नं. ४११००१.
3. मा. विभागीय उत्पादन शुल्क आयुक्त, कौन्सिल हॉल, पुणे – ४. 4. मा. महसूल मंत्री,
मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई क्र. 32. ५. आई मुख्यमंत्री,
मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई नं. ३२.
6. मा. नगरविकास मंत्री,
मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई नं. ३२.


















