
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२४) पिंपरी गरुवारी मनपा भवन येथे पिंपरी चिंचवड ज्युनिअर इंजिनीअर्स असोसीएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या बैठकीत सुनील बेळगावकर यांच्यासह कार्याध्यक्ष – चंद्रकांत कुंभार, सचिव – संतोष कुदळे, सहसचिव विपीन थोरमोठे, खजिनदार – महेंद्र देवरे, सह खजिनदार – सचिन मगर आणि महासंघ प्रतिनिधी – अभिमान भोसले यांची निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष बेळगावकर म्हणाले की, येणाऱ्या काळात इंजिनीअर्स व अधिकारी यांच्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान कार्यशाळा, परिषदांचे आयोजन करण्यात येईल. शहरात विकासकामे करताना अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून काम करावे लागते. अशावेळी अनेक समस्या उद्भवतात त्यावेळी स्वतः मी आणि असोसीएशनचे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. देशातील विविध शहरांमध्ये विकसित करण्यात आलेल्या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यातील योग्य ते प्रकल्प पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यासाठी असोसिएशन प्रामुख्याने प्रयत्न करील.
सुनील बेळगावकर यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १६ वर्षांची सेवा झाली असून यापूर्वी त्यांनी असोसिएशनच्या विविध पदांवर काम केले आहे.
—————————————


















