
प्रातिनिधि : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे शैक्षणिक संकुल डूडूळगाव- आळंदी. पुणे-412105 राजमाता जिजाऊ शैक्षणिक संकुलात 78 वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा. डूडुळगाव शैक्षणिक संकुलात 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाला कॅप्टन पदमसिंह सिकरवार अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला. त्याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.विलास लांडे साहेब, सचिव मा.श्री. सुधीर मुंगसे, खजिनदार श्री.अजित गव्हाणे, श्री. विक्रांतदादा लांडे, सौ. शुभांगी ताई लांडे, सौ. विनयाताई मुंगसे, श्री. सुमित मुंगसे, प्रा. किरण चौधरी, रजिस्ट्रार सौ.अश्विनी भोसले सर्व प्राचार्य डाॅ. किशोर जैन, डाॅ. धनंजय बागूल, डाॅ. लक्ष्मण चौधरी, सौ.नीतू अरोरा, सौ. धनश्री कुतवाळ, सौ. उर्मिला जाधव, डाॅ. के. जी. कानडे सर, कुंभार सर, शेळके सर, भालेराव सर यांच्यासह ज्यांनी भारत देश करिता योगदान दिलेले होते ते सर्व निवृत्त सैन्य सेवेतील अधिकारी कॅप्टन वसंत तानाजी शिंदे, कॅप्टन भास्कर आंब्रे, कॅप्टन उमेशसिंग पनवर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यदिना निमित शैक्षणिक संकुलात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ज्ञानभक्ती स्कूल व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, भाषण, परेड इ. विविध कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्टतेचा यथोच्चीत सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला लाभलेल्या मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षांनी शाल व श्रीफळ देऊन केला. आपल्या भाषणात मा.श्री. विलासराव लांडेसाहेब म्हणाले. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या विचारात घेता परीसरात राहणाऱ्या लोकांची गरज पाहता आम्ही या परीसरात राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत, विविध महाविद्यालये आणि शाळा सुरु केली. या छोट्या रोपट्याचा आज वटवृक्ष होताना दिसत आहे. सुमित मुंगसे यांनी म्हटले,संस्था परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सोयीसुविधा पूर्ण करण्यास कटिबंध आहे. शैक्षणिक संकुलात आज विविध कोर्सेस सुरू केलेत, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. अध्यक्षीय भाषणात कॅप्टन पदमसिंग सिकरवार 15 ऑगस्ट 1947 हा दिवस स्वतंत्रदिन म्हणून का निवडला त्याचा इतिहास मनोगतातून विशद केला. तसेच त्या काळातील समाजव्यवस्था , भौगोलिक रचना यांची माहिती दिली. संस्थेचे खजिनदार मा.श्री.अजित गव्हाणे, परिसरातील पालक,विद्यार्थी यांच्या शिक्षणाची सोय आपल्या संस्थेने करून दिली, त्यामध्ये विविध कोर्सेस महाविद्यालयात सुरू झालेत आणि पुढे जाऊन इतर सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे असे सांगितले. सुञसंचालन सौ.कल्याणी केरहळकर व श्री. आकाश गावडे यांनी केले. सौ. कुतवाळ मॅडम यांनी आभार मानले. या प्रसंगी डूडुळगाव शैक्षणिक संकुलातील प्राचार्य, उपप्राचार्य प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पालक वर्ग, सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते


















