
प्रातिनिधि : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दि. २२ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साो यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून संघामध्ये रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रदीपदादा गारटकर साो. यांचे हस्ते करणेत आले.
सदर कार्यक्रमात १०१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला, १५० नेत्र तपासणी करून ११० चष्मे मोफत वाटण्यात आले व १०१ वृक्ष रोपन संस्थेच्या वतीने करण्यात आले. सदर कार्यक्रमास संघाचे मा.चेअरमन श्री. भगवान पासलकर, जेष्ठ संचालक श्री. गोपाळराव म्हस्के, संचालक श्री. दिलिप थोपटे, संचालक श्री. कालिदास गोपाळघरे, संचालिका सौ. लताताई गोपाळे, व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोज लिमये व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.


















