
प्रातिनिधि : शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची अधिकृत उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दिल्ली दौरा झाला की दोन ते तीन दिवसांत महायुतीचे उमेदवार ठरतील. आढळराव पाटलांच्याबाबतचा निर्णयही दोन ते तीन दिवसांत जाहीर होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आढळराव पाटलांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांकडून प्रखर विरोध होतांना दिसत
शिवसेना शिंदे गटात असलेले आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र आढळराव पाटलांच्या उमेदवारीला अजित पवार गटातल्या काही नेत्यांनी प्रखर विरोध केला आहे. आमदार मोहिते पाटील यांनी याआधीच आढळराव पाटलांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.
तर माजी आमदार विलास लांडे यांनी आढळराव पाटलांना मोठा विरोध केला आहे. यातच विलास लांडे यांचं काही पोस्टर सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. यामध्ये विलास लांडे यांचा हसतांनाचा फोटो आहे. अन् त्यातहे स्मित हास्य अनेकांची झोप उडवणार असे म्हणत मिशन 2024 असाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे विलास लांडे अपक्ष म्हणून लढणार का ? अशीही चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, विलास लांडे यांनी याआधीही अपक्ष म्हणून निवडणुक लढवली आहे. यातच आता शिवाजीराव आढळराव पाटलांना विलास लांडे यांनीही विरोध केला आहे. त्यामुळे नाराज झालेले विलास लांडे आता काय भूमिका घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


















