
प्रातिनिधि : वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
यानिमित्ताने राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ पूजन आणि मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विलास लांडे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा या ज्ञानग्रंथांचे पूजन करण्यात आले . त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे महत्व सांगितले, आपली मातृभाषा आपण जपली पाहिजे, आपल्या भाषेवर प्रेम केले पाहिजे, आज तंत्रज्ञानाच युग आहे या विज्ञानवादी युगात आपल्या मराठी भाषेचे महत्व कायम आहे त्याच कारण म्हणजे आपले संत साहित्य, संत साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागा सोबतच अनेक मान्यवर पदाधिकारी, प्राध्यापकांनी सर्वांनी मराठीमध्ये सही करून या उपक्रमात सहभाग नोंदविला. यामध्ये उपप्राचार्य किरण चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे , प्रबंधक अश्विनी भोसले, डॉ .धनंजय बागुल यांच्या


















