
पिंपरी प्रतिनिधी : जिजामाता रुग्णालयातील स्थायी आस्थापनेवरील कर्मचारी डॉक्टर,सिस्टर इन्चार्ज,लॅब टेक्नशियन,फार्मसिस्ट, वार्डबोय,वार्डआया,सफाई कर्मचारी हे वर्षानुवर्षे एकच ठिकाणी काम करत आहेत ,त्यामुळे त्यांचे तिथं कंत्राटी कर्मचारी यांचावर चांगलाच दबदबा निर्माण आहे एकाच जागेवर वर्षानुवर्षे काम करत असल्यामुळे त्यांना त्या पदाचे गांभीर्य राहिले नसून त्यांचा तिथ मनमानी कारभार , चालु आहे जिजमाता हॉस्पिटल मधील संकपाळ मीना व किरण गायकवाड व ईतर कर्मचाऱ्यांचा चौकशीचा अहवाल आम्ही माहिती अधिकारात मागितला असल्याचे तिरंगा आदर्श कमिटीचे अजय खराडे यांनी सांगीतले
जिजामाता हॉस्पिटल मध्ये नागरिकांना उडवा उडविची उत्तरे दिली जातात आम्ही तुमची नोकर नाहीत एवढीच घाई आहे तर सरकारी दवाखान्यात का आले खाजगी दवाखान्यात जायचं ना असे उत्तरे मिळतात अश्या व्यकातीवर प्रशासन यांचावर कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप अजय खराडे यांनी केला आहे , या मागे कोणाचे घरे भरत आहे ह्या गोष्टी अजून अद्याप स्पष्ट झाल्या नाहीत.बदलीसाठी पात्र असलेले अधिकारी व कर्मचारी यांचा अद्याप बदल्या झाल्या नाहीत,शासनाने गेल्या वर्षापासून बदलीचा महिना जून केला होता.त्यामुळं जून महिन्याच्या अखेर पर्यंत २२७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या परंतु डिसेंबर चालू होऊन संपायला आलंय तरी आरोग्य विभागातील बदल्या आजुन का झाल्या नाहीत असा सवाल अजय खराडे यांनी केला


















