
प्रतिनिधी : भोसरी विधानसभा मतदार संघातील काही महिला कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी सौ. गौरी प्रमोद शेलार यांना पथारी हातगाडी भाजी विक्रेते सेलच्या शहराध्यक्षा म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला.
याप्रसंगी माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनावणे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ जगताप, डाॅक्टर सेल अध्यक्षा मनिषा गरूड, उपाध्यक्षा अर्चना राऊत, मागासवर्गीय सेल अध्यक्ष विजय ओव्हाळ, भोसरी विधानसभा अध्यक्ष विठ्ठल शिंदे, हरीश डोळस, पांडुरंग जगताप, प्रा. किरण खाजेकर, मिलिंद फडतरे, सचिन कदम, जुबेर खान आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.


















