
प्रतिनिधी : मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी जालना येथे आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बारामतीचे रहिवाशी अविनाश पाटील हे बारामतीहून सायकल चालवत जालना येथे जात आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी येथे उपोषणांस बसलेले संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांना भेट दिली. यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी अविनाश पाटील यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच याप्रसंगी मराठा महासंघाचे प्रकाश जाधव, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) देवेंद्र तायडे, संदीपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे यासर्व मान्यवरांच्या शुभहस्ते अविनाश पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


















