
प्रतिनिधी : आजकालच्या इंटरनेट च्या तसेच धावपळीच्या काळात माणूस आपले आरोग्य ही तितक्याच तीव्रतेने खराब करत चालला आहे.रोजचे व्यवहार, व्यवसाय , नोकरी ,घर संसार चालवता चालवता नैराश्याच्या गर्तेत अडकत चालला आहे,अपयश अपमान, मान सन्मान सर्वच चक्रामधून संसाराचा गाडा ओढत दिवस काढत आहे.
परंतु सर्व गोष्टींवर औषध असते तसेच नैराश्यातून तणावातून मार्ग काढण्यासाठी देखील कोणी तरी थोडासा आधार दिला मानसिक धीर दिला तर यातून मार्ग काढणे खूप सोपे होऊन जाते. यासाठीच जनशिल हॉस्पिटल नेहरूनगर माजी नगरसेवक श्री. राहुल भाऊ हनुमंतराव भोसले माझी पक्षनेता पिंपरी चिंचवड मनपा तसेच माजी नगरसेविका डॉ. वैशालीताई घोडेकर (लोंढे) माजी महापौर पिंपरी चिंचवड मनपा यांच्या मदतीने तणावा मागची मानसिकता व आधार मार्गदर्शन व्याख्यान सत्राचे आयोजन केले आहे.
प्रामुख्याने
*परीक्षेतील नोकरीतील अपयश म्हणून आत्महत्या डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या.*
*मला हो म्हणत नाही म्हणून खून*
*आधी हो म्हटलं आता नाही म्हणते म्हणून खून*
*तिने सारखं लग्नासाठी तगादा लावला म्हणून खुन.*
*गांजा सारख्या व्यसनाखाली बेकारीतून पैसे चोरी मारामारी यातून खून*
*तासंतास टीव्ही मोबाईल, युट्युब, टीक टॉक, इंस्टाग्राम, इत्यादीचे व्यसन व वेळेचा अपव्य या सर्व मागची मानसिकता लक्षणे*
यातून बाहेर पडण्याचे उपाय मार्गदर्शक डॉ. जयदीप पाटील, सौ. स्मिता कर्वे श्री. सचिन थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जनशील हॉस्पिटल नेहरूनगर यांनी आयोजित केले आहे तरी जास्तीजास्त नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे. दिनांक ०९ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र झिरो बॉईज चौक नेहरूनगर याठिकाणी ही व्याख्यानमाला पार पडणार आहे.


















