
प्रतिनिधी : मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी पुणे 39 येथे ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला .
महाविद्यालयाच्या प्रांगणापासून श्री छत्रपती शिवाजी चौक लांडेवाडीपर्यंत पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती .
याप्रसंगी भोसरीचे प्रथम आमदार व संस्थेचे अध्यक्ष मा .श्री . विलास लांडे, विद्यमान नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा व संस्थेचे खजिनदार मा.श्री. अजितभाऊ गव्हाणे, सचिव मा. श्री . सुधीर मुंगसे, नगरसेवक मा.श्री.संजय वाबळे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक पाटील. उपप्राचार्य प्रा .किरण चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ . नेहा बोरसे,रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . श्रेया दाणी, रजिस्ट्रार सौ.अश्विनी भोसले शारीरिक शिक्षण संचालक डॉ गणेश चव्हाण,प्रा.गोपीचंद करंडे, प्राचार्य फार्मसी कॉलेज डुडुळगाव डॉ. धनंजय बागूल, डॉ. चिंतामणी, डॉ. जैन किशोर, सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांची आरती मोठ्या जल्लोषात करण्यात आली . त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या नावांचा जयघोष करण्यात आला.छत्रपतींच्या घोषणांनी अवघा परिसर दुमदुमला .


















