
प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कार्यक्षम नगरसेवक मा .राहुलभाऊ भोसले यांच्या व समीर दादा मासुळकर. वैशालीताई घोडेकर. गीता ताई मंचरकर. यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे च प्रभाग क्र 9 मधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्राथमिक शाळा, नेहरूनगर मधील एक ईमारत धोकादायक झाली होती, परंतु शहरातील कोणताही आमदार खासदारांनी या शाळेकडे कधी लक्ष न दिल्यामुळे मुलांची सुरक्षा धोक्यात आल्याचे पाहून स्थानिक कार्यक्षम नगरसेवक मा. राहुल भाऊ भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांमुळे, मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेवून प्रभाग क्रमांक नऊच्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून त्या ईमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. व ईमारत धोकादायक असल्याने ती ईमारत पाडण्याचा ठराव केला. आणि ती जुनी ईमारत पाडून त्याठिकाणी नवीन सर्व सोयी युक्त अशी अत्याधुनिक ईमारत बांधण्यासाठी खूप प्रयत्न केले, पालिकेकडून निधी घेतला, ईमारतीचे डिझाईन फायनल केले. ईमारत उभारताना बारिक बारिक गोष्टींकडे लक्ष दिले, व आज रोजी. नेहरूनगर व आजूबाजूच्या गोरगरीब कष्टकरी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही नवीन सुंदर शाळा ईमारत उभी झाली, आज महापालिकेत प्रशासक राजवट आहे, त्यामुळे उदघाटन कोणाच्या हस्ते होणार, श्रेय कोण घेणार यापेक्षा या नवीन शाळा बांधणीचे सर्व श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 9 चे कार्यक्षम नगरसेवक मा. राहुल भाऊ भोसले तसेच*ह्या नवीन शाळा उभारणीचे संपूर्ण श्रेय व मेहनत आमच्या चारही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे आहे,


















