प्रतिनिधी : डूडुडगाव येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयास नॅक कडून नुकतेच *’अ’ श्रेणी चे मानांकन एकूण ५ वर्षांसाठी प्राप्त झालेले आहे* व एकूण सीजीपीए ३.२१ आलेला आहे. महाविद्यालयाच्या वतीने सप्टेंबर २०२२ मध्ये अर्ज केला होता त्यानंतर नॅक समितीच्या सदस्यांनी दिनांक ३ व ४ चार मार्च रोजी प्रत्यक्ष महाविद्यालयाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केलेली होती. संस्थेचे एकंदरीत कामकाज, सेवा सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता, विविध उपक्रम अतिशय चांगले असल्याने महाविद्यालयास प्रथम फेरीतच ‘अ’ नामांकन मिळाले आहे . या महाविद्यालयाची स्थापना २००७ या साली झाली, असून, नॅकच्या प्रथम फेरीतच महाविद्यालयास चांगला दर्जा प्राप्त झाला हे उल्लेखनीय आहे. यामध्ये व्यवस्थापन मंडळ, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व
विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान आहे. मुख्यतः महाविद्यालयाने विद्यापीठीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचे फळ म्हणून महाविद्यालयास ‘अ’ श्रेणी मिळाली. महाविद्यालयाने ग्रंथालय, क्रीडांगण, प्लेसमेंट, संशोधन, चर्चासत्र आदी सुविधा सुधारून व ग्रीन इकोफ्रेंडली कॅम्पस, रीनिवेबल एनर्जी असे विशेष उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ.किशोर एस.जैन* यांनी सांगितले. नॅक मूल्यांकनामध्ये उत्कृष्ट मानांकन प्राप्त होणे, ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद कामगिरी आहे. संस्थेतील सर्वच कर्मचारी, विद्यार्थी यांनी सातत्याने चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे ही श्रेणी मिळाली आहे, अशा शब्दात भोसरीचे प्रथम आमदार व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष *श्री.विलासजी लांडे* , संस्थेचे सचिव मा. श्री *सुधीरजी मुंगसे*, खजिनदार *मा.अजित गव्हाणे*, विश्वस्त *विक्रांतजी लांडे* यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ.किशोर एस.जैन* नॅक समन्वयक *डॉ.जीवन धुमाळ*, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे वतिने *प्रा किरण चौधरी* व *रजिस्ट्रार सौ अश्विनी भोसले-चव्हाण* यांचे प्राचार्यांनी विशेष आभार मानलेत.