
प्रतिनिधी : कै गणपतराव जगताप प्रतिष्ठान अंतर्गत शिवदत्त नगर पिंपळे गुरव येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी नगरसेवक मा राजेंद्र जगताप यांच्या हस्ते पार्वती महिला बचत गटाचे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी मा राजेंद्र जगताप यानी महिलांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील महिला बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना बाबतीत माहिती दिली तसेच महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्माण केला पाहिजे त्यासाठी आवश्यक ते सहकार्य प्रतिष्ठान च्या माध्यमातून केले जाईल.याप्रसंगी प्रभाग क्रमांक 45 प्रभाग अध्यक्ष मा शिवाजी चव्हाण ,पार्वती बचत गटाच्या अध्यक्षा सौ पार्वती जाधव उपाधक्षा श्रीमती उत्तेकर तसेच सर्व सभासद उपस्थित होते.

















