
प्रतिनिधी : टाटा मोटर्स मित्र परिवारच्या वतीने मोशी येथील युवा उद्योजक, सक्षम फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अतिशशेठ बारणे यांना शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युवा योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या वेळी टाटा मोटर्स युनियनचे कार्याध्यक्ष सतीश काकडे, उपाध्यक्ष सचिन टेकवडे, युनियन कामगार नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोथरूड बावधन चे राजेंद्र उभे इतर मान्यवर उपस्थित होते.
अतिष बारणे यांनी करोना काळात परिसरातील कुटुंबाना स्व खर्चाने डोस उपलब्ध करून दिले. नागरिकांच्या आरोग्यासाठी चार अंबुलन्स दिल्या, गेली अनेक वर्षे भीमाशंकर भागातील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप करत आहेत. तसेच आपल्या भागातील नागरिकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन टेकवडे यांनी केले, आभार राजेंद्र उभे यांनी मानले.


















