
प्रतिनिधी : ,चिखली मोरेवस्ती परिसरातील पाणीपुरवठा सुरुळीत करावा याबाबत निवेदन महापालिका पाणी पुरवठा अधिकारी व जलनिःसंसारण विभागाला राष्ट्रवादी काँग्रेसचे विदयार्थी शहराध्यक्ष यश दत्ता साने यांनी दिले आहे गेल्या काही वर्षांपासून चिखली मोरेवस्ती या भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांमध्ये महापालिका प्रशासना विरोधात तीव्र असंतोष आहे.
पुढे निवेदनात म्हंटले आहे की कर भरणा करूनही जे नागरिकांना मुबलक आणि नियमितपणे पाणीपुरवठा होत नाही, ही शोकांतिका आहे. पाणीपुरवठा पुरेशा दाबाने आणि नियमित करावा; अन्यथा स्थानिक महिलांसह महापालिका भवनावर हंडा मोर्चा काढण्यात येईल, याची नोंद घ्यावी असा इशारा दिला आहे.


















