
प्रतिनिधी : *सोनार समाजसेवा संस्था विश्वकर्मा भवन ,निगडी प्राधिकरण येथे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान !*सोनार समाजसेवा संस्था यांच्यातर्फेविश्वकर्मा भवन निगडी प्राधिकरण येथे महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला . त्यामधे संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गळंगे यांनी संस्थेची माहिती दिली तर निवेदिका गीता महामूनी यांनी अध्यक्ष भारतीताई चव्हाण ( मा . नगरसेविका ) व प्रमुख पाहुणे शर्मिला महाजन यांचा परिचय करुन दिला त्यानंतर समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला .शशिकला फिसरेकर , स्मिता लोणकर , शारदा पानगे , अस्मिता पंडीत , डाॅ बोरगावकर , सुजाता वेदपाठक , प्राजक्ता घबाडे ,अमृता भूमकर , आर्किटेक्ट पूजा दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला .प्र मुख पाहूण्या शर्मिला महाजन यांनी सोनार समाजाबद्दल त्यांच्या कामातील सचोटीबद्दल माहिती दिली तर अध्यक्ष भारतीताई चव्हाण यांनी सर्व महिलांना सक्षम कसे करता येईल तसेच ५०% आरक्षणाचा कसा फायदा करून घेता येइल याबद्दल मार्गदर्शन केले . संस्थेतर्फे सौ गळंगे व सौ उमा दीक्षित यांनी अध्यक्ष भारतीताई चव्हाण व प्रमूख पाहूणे शर्मिला महाजन यांना श्रीफळ व शाल देवुन आभार व्यक्त केले
या मूख्य कार्यक्रमानंतर प्रतिबिंब अभिव्यक्ती यांचा सप्तरंग सप्तसूर हा गायनाचा बहारदार कार्यक्रम पार पडला संपूर्ण कार्यक्रमाला समाजाचा विशेषता महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला .


















